स्टेट बँकेने बदलले हे नियम, बँकेत जाण्यापूर्वी आधी हे जरुर जाणून घ्या...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (SBI-State Bnak of India) आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत.
मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तथापि लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध आहेत. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने (SBI-State Bnak of India) आपल्या सेवांविषयी काही बदल केले आहेत. एसबीआयने आता शाखा उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या वेळेतही बदल केला आहे. तसेच बँक आता निवडक काम करेल. आता सामान्य कामे केली जाणार नाहीत. (sbi bank changed timing of opening and working rules)
एखादे महत्वाचे काम असेल तरच बँकेत जा
ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, SBI बँक ग्राहकांनी केवळ अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी शाखेत भेट द्यावी. तसेच बँकेच्या शाखा दुपारी अडीचपर्यंत सुरु असणार आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत सकाळी 10 ते पहाटे 1 दरम्यान ते बँकेत गेले तर तुमचे काम होईल.
बँक उघडण्याची वेळ बदलली
SBI शाखा आता सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत उघड्या राहतील. मित्रांनो, नवीन अधिसूचनेत स्पष्टपणे सांगितले आहे की बँकेची प्रशासकीय कार्यालये आणि 50 टक्के कर्मचारी यांच्यासह संपूर्ण बँकिंग तास पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतील.
मास्कशिवाय बँकेत प्रवेश नाही
बँक शाखेत जाणाऱ्या ग्राहकांनी मास्क लावायलाच हवा नाहीतर त्यांना आत जाऊ देणार नाही. इतकेच नव्हे तर आता एसबीआयने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार बँकेत फक्त 4 कामे होणार आहेत.
1. रोख ठेव आणि पैसे काढणे
2. चेक संबंधित कामे
3. डीडी अर्थात डिमांड ड्राफ्ट / आरटीजीएस / एनईएफटीशी संबंधित काम
4. शासकीय चलान
बँकेची फोन सेवा वापरा
ग्राहक एसबीआय (SBI) फोन बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. एसबीआय फोन बँकिंगसाठी प्रथम नोंदणी करावी लागेल. यानंतर संकेतशब्द (पासवर्ड) तयार करावा लागतो. ग्राहक संपर्क केंद्राद्वारे फोनवर दिलेल्या सेवेचा लाभ घेऊ शकतात.