नवी दिल्ली : आपलं हक्काच एखाद घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण घरांच्या वाढत्या किंमती आणि वाढते व्याज दर यामूळे हे बऱ्याचदा अपूर्णच राहते. पण स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने ही संधी आता आवाक्यात आणली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पब्लिक सेक्टरमध्ये सर्वात मोठी बँक असलेल्या बॅक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने गृहकर्ज आणि ऑटो कर्जांवरील व्याजदरात ०.०५ टक्क्याने कपात केली आहे. आता गृहकर्जवरील व्याज ८.३० पर्यंत वाढले आहे, जे आधी ८.३५ टक्के होते. त्याचप्रमाणे एसबीआय ऑटो लोनवरील व्याजदर ८.७५ टक्क्यांवरून ८.७० टक्के झाले आहेत.


एसबीआयच्या व्याजदरात कपात करण्याच्या घोषणेनंतर, इतर बँकांही याचे अनुकरण करतील अशी सर्वांना आशा आहे. येत्या काळात ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर योजना येऊ शकतात. 


गृहकर्जातील या कपातीनंतर एसबीआयचे होम लोन हे बाजाराती सर्वात कमी व्याजदराने उपलब्ध असणारे ठरणार असल्याचे  एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे. हे नवे व्याजदर नोव्हेंबर 2017 पासून लागू होत आहेत.


याआधी एसबीआयने फंड-आधारित कर्ज दरात (एमसीएलआर) एसबीआयने कपात केली होती. गेल्या १० महिन्यांत पहिल्यांदाच ही कपात केली होती. 
व्याजदरातील कपातीनंतर लोनच्या आधिक ऑफर्सना स्वस्त दरात आणत असल्याचे एसबीआय रिटेल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी सांगितले.