मुंबई : SBI ATM Withdrawl Rule Changed | तुम्हीही पैसे काढण्यासाठी नियमित  एटीएमचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी. एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्हाला SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी OTP टाकावा लागेल. आता नवीन नियमानुसार, ग्राहक ओटीपीशिवाय पैसे काढू शकत नाहीत. रोख रक्कम काढण्याच्या वेळी, ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी प्राप्त होतो, तो प्रविष्ट केल्यानंतरच एटीएममधून पैसे काढता येतात.


एका ट्विटमध्ये माहिती देताना बँकेने म्हटले आहे की, 'एसबीआय एटीएममधील व्यवहारांसाठी आमची ओटीपी आधारित रोख पैसे काढण्याची प्रणाली फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध परिणामकारक ठरणारी आहे. फसवणुकीपासून खातेधारकांचं संरक्षण करणे हे नेहमीच आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. 


हे नियम 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर लागू आहेत. 10 हजारावरील रक्कम काढण्यासाठी ओटीपी टाकावा लागणार आहे.


नवीन नियम जाणून घ्या


SBI ATM मधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला OTP टाकावा लागेल.
यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल.
ग्राहकाला एकाच व्यवहारासाठी चार अंकी क्रमांकासह ओटीपी मिळेल.
रोख काढण्यासाठी या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करावा लागेल.