नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक SBI (स्टेट बॅंक ऑफ इंडिया) ने शनिवारी आपल्या १३०० शाखांची नावे आणि IFSC बदलवला आहे. बॅंकेचा हा निर्णय पाच सहयोगी बॅंकांच्या विलिनिकरणानंतर घेतल्याचे बोलले जात आहे. 


IFSC चा अर्थ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IFSC चा अर्थ इंडियन फायानॅन्शिअल सिस्टम कोड असा होतो. ११ कॅरेक्टरचा हा अ‍ॅल्फा-न्यूमेरिक कोड RBI कडून जारी केला जातो. ज्याने बॅंकेच्या प्रत्येक शाखेची ओळख पटवली जाते. 


ऑनलाईन ट्रान्सफरसाठी IFSC कोड


NEFT आणि RTGS सारख्या ऑनलाईन पैसे ट्रान्सफरसाठीही IFSC कोड गरजेचा असतो. प्रत्येक बॅंकेचे ग्राहक सोप्या पद्धतीने चेक किंवा बॅंककडून जारी करण्यात आलेल्या दुस-या कागदपत्रांतून या कोडची माहिती मिळवू शकतात. SBI प्रबंध निर्देशक प्रवीण गुप्ता म्हणाले की, IFSC कोडच्या बदलाबाबत ग्राहकांना माहिती देण्यात आली आहे. पण आंतरिक रूपाने बॅंकेने ग्राहकांना एका नव्या कोडने जोडले आहे. 


बॅंकेकडून खुलासा


ते म्हणाले की, ‘जर काही पेमेंट जुन्या IFSC कोडवरून होत असतील तर ते नव्या कोडसह जोडले जातील. याने कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येणार नाही’. बॅंकेने आपल्या वेबसाईटवर शाखांचे जुने, नवे नावं आणि IFSC कोडची लिस्ट जारी केली आहे. इतकेच नाहीतर ग्राहक SBI च्या ब्रॅंच लोकेटर द्वारे सुद्धा बदलेला IFSC कोड चेक करू शकतात. यासाठी त्यांना ऑनलाईन काही माहिती भरावी लागेल. 


पाच बॅंकांचे विलिनीकरण


याच वर्षी एप्रिलमध्ये पाच सहयोगी बॅंका स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अ‍ॅन्ड जयपूर, स्टेट बॅंक ऑफ पटियाला, स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर आणि भारतीय महिला बॅंकेचेही SBI मध्ये विलिनिकरण झाले होते.