मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया जूनियर असोसिएट्सच्या (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) 5 हजार पदांची भरती करणार आहे. ही भरती एसबीआयच्या देशभरातील शाखांमध्ये केली जाणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज सध्या सुरु झाले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in, bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. जर तुम्हाला या पोस्ट्ससाठी अर्ज करायचा असेल, तर या पादाची माहिती जाणून घ्या.


पात्रता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही विषयातून पदवीधर उमेदवार या पदांवर अर्ज करू शकतात.


वयोमर्यादा


उमेदवारांचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे.


निवडप्रक्रिया


जूनियर असोसिएट्स (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) या पदांच्या उमेदवारांच्या निवडीसाठी, ऑनलाईन प्रिलिम्स परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि उमेदवारांनी निवडलेली स्थानिक भाषा परीक्षा घेण्यात येईल.


प्रिलिम्स परीक्षा ही 1 तासाची असणार आहे. यामध्ये इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्क क्षमता यांच्याशी संबंधित एकूण 100 प्रश्नं असतील. ही परीक्षा 100 गुणांची असणार आहे, तसेच यामध्ये 0.25 गुणांची निगेटिव्ह मार्कींग देखील असणार आहे. प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसण्याची संधी मिळणार आहे.


अर्ज फी


उमेदवाराला 750 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.


पगार


निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन 17 हजार 900 ते 47 हजार 920 रुपये असेल. परंतु सुरुवातीला 19 हजार 900 रुपये मिळेल.


अर्ज कसा करावा


इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in, bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्याशिवाय खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन उमेदवार सहज अर्ज करू शकतात.


(https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/)