नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे. 


काय आहे नवा नियम?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेकडून या चार्जमध्ये ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ एप्रिल २०१८ पासून लागू होतील. या नव्या नियमानुसार कोणत्याही खातेदाराला १५ रूपयांपेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही. ही रक्कम आत्तापर्यंत ५० रूपये इतकी होती. 


कोणत्या शहरात किती चार्ज


मेट्रो आणि शहरी परीसरात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास चार्ज ५० रूपयांवरून १५ रूपये केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आलाय. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल. 


का घेतला हा निर्णय?


बॅंक रिटेल आणि डिजिटल बॅंकिंगचे एमडी पीके गुप्ता म्हणाले की, आमच्या ग्राहकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. 


२५ कोटी खातेदारांना होणार फायदा


बॅंकेच्या या निर्णयामुळे २५ कोटी खातेदारांना फायदा होणार आहे. सध्या एसबीआयमध्ये जवळपास ४१ कोटी बचत खाती आहेत. त्यातील १ कोटी खाती पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आहेत.