नवी दिल्ली :  तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे. 


एटीएमचा अॅन्युल चार्ज 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शिवाय लोकांनी ट्विटरवर एसबीआयला टॅग करून या संदर्भात माहिती मिळविण्याच प्रयत्न केला. तुमचेही पैसे कट झाले आणि तुम्हांला माहिती नसेल तर तुम्ही बँक स्टेटमेंट पाहिल्यावर तुम्हांला लक्षात येईल की पैस का कट झाल आहेे. हा एसबीआयकडून एटीएमचा वार्षिक चार्ज आहे. त्यामुळे ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. यात अॅन्युल चार्जशिवाय जीएसटीही सामील आहे. 


एप्रिल २०१७पासून केला बदल 


एटीएम चार्ज खात्यातून प्रत्येक वर्षी कट करण्यात येतो. पण यंदा ही रक्कम जास्त कट झाली आहे. एप्रिल २०१७ मध्ये एसबीआयने आपल्या सेवांच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आला आहे. अशात बँकेकडून एटीएम चार्जमध्येही वाढ करण्यात आली. बँकेकडून गोल्ड आणि सिल्वर कार्डसाठी वेगवेगळे चार्ज लावण्यात आले आहेत. 


आता १२५ रुपये झाला एटीएम चार्ज 


आता बँकेने एटीएम चार्ज वाढवून १२५ रूपये करण्यात आले आहेत. यात जीएसटीचा समावेश आहे. त्यामुळे एकूण चार्ज १४७.५० रुपये कट करण्यात येणार आहे.