सणासुदीच्या दिवसांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर; SBI ची स्पेशल होम लोन ऑफर
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव बोनांजा (SBI Home Loan Festive Bonanza)सादर केले आहे
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी फेस्टिव बोनांजा (SBI Home Loan Festive Bonanza)सादर केले आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये घर खरेदीचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी सहज कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन (credit score linked home loans) ऑफर केले आहे. यामध्ये ग्राहकांना साधारण 6.70 टक्के वार्षिक व्याज दराने होम लोन मिळू शकते. तसेच लोन अमाउंटची कोणतीही लिमिट नसणार आहे. एसबीआयने होम लोनसाठी प्रोसेसिंग फीमध्ये पूर्णतः सूट दिली आहे.
क्रेडिट स्कोअर लिंक्ड लोनचा अर्थ ज्या ग्राहकाचे क्रेडिट स्कोअर जेवढे चांगले, त्या ग्राहकाला तेवढे स्वस्त होम लोन मिळू शकते. होम लोन बॅलेन्स ट्रान्सफर करणाऱ्या ग्राहकांना हीच व्याज दरे लागू होतील.
लोन अमाउंटचीची मर्यादा नाही.
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, आधी 75 लाख रुपयांहून अधिकच्या गृहकर्जासाठी व्याज दरे 7.15 टक्क्यांपासून सुरू होत होते. आता या सणांच्या ऑफरनंतर ग्राहकांना कितीही होम लोन कमीत कमी 6.70 टक्के वार्षिक व्याजावर घेता येईल. यापद्धतीने 75 लाखाहून अधिक होम लोन घेणाऱ्या ग्राहकांची 0.45 टक्क्यांची बचत होणार आहे. म्हणजेच 75 लाखांच्या लोनवर 30 वर्षानंतर 8 लाखाहून अधिक व्याजाची बचत होऊ शकते.