SBI Latest Updates : तुम्ही स्टेट बँकेचे खातेधारक असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit - FD) सुरु करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी बँकांमध्ये करण्यात आलेल्या एकूण फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit - FD) मध्ये या बँकेचा 36 टक्के इतका वाटा आहे. अशा या स्टेट बँकेकडून कायमच खातेधारकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जातात. पण, आता मात्र ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये बँकेनं अनेकांचा हिरमोड केला आहे. 


एसबीआयकडून फेब्रुवारी 2023 नंतर एफडी रिवाईज केलेल्या नाहीत. थोडक्यात एफडींवरील व्याजदरात कोणतीही वाढ बँकेकडून करण्यात आलेली नाही. किंबहुना हे दर घटवण्यातही आले नसून ते स्थिर ठेवण्यात आले आहेत. 


कोणत्या एफडीसाठी किती व्याजदर?


एसबीआयमध्ये 7 दिवस ते 45 दिवसांसाठीच्या एफडीमध्ये  3% व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आकडा 3.50 टक्के इतका आहे. 46 ते 179 दिवसांसाठीच्या एफडीवर 4.5 टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के आहे. 1 ते 2 वर्षांसाठीच्या एफडीवर बँकेकडून 6.8 टक्के व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आकडा जास्त म्हणजेच 7.30 इतका आहे. तर, 2 ते 3 वर्षांच्या कालावधीतील एफडीवर बँक तुम्हाला 7 टक्के व्याज देते. 


3 ते 5 वर्षांदरम्यानच्या एफडीवर बँकेकडून 6.5 टक्के व्याज देते. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7 टक्के आहे. 5 ते 10 वर्षांसाठीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 6.5 तर, ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के इतकं व्याज दिलं जातं. 


हेसुद्धा वाचा : RD Interest Rates: बँक की पोस्ट ऑफिस; आरडीवर सर्वाधिक व्याज कोण देतं? 


एसबीआयकडून खातेधारकांना 400 दिवसांसाठीच्या एफडीचीही तरतूद करण्यात आली आहे.  'एसबीआय अमृत कलश' (SBI Amrit Kalash)  असं या योजनेचं नाव. या एफडीवर 7.10 टक्के इतका व्याज दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्यजदर 7.60 इतका आहे. एसबीआयनं व्याजदरांमध्ये कोणतीही वाढ केली नसल्यामुळे आता ज्या खातेधारकांनी व्याजाची अपेक्षा ठेवली होती त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे.