मुंबई : SBI Gold Deposit Scheme : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी खास ऑफर दिली आहे. SBI ने गोल्ड डिपॉझिट स्कीमला नव्या अवतारात लाँच केला आहे. ही गोल्ड फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये बँकेत सोने जमा करा. याबदल्यात तुम्हाला व्याज मिळणार आहे. यामध्ये तुमचं सोनं देखील सुरक्षित राहतं आणि तुमच्या पैसे देखील मिळतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBI Gold Deposit Scheme  योजनेसाठी पात्रता आहे.  कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या व्यतिरिक्त प्रॉपराइटर, एचयूएफ, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड असू शकतो जो सेबी, कंपन्या, धर्मादाय संस्था आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही घटकाकडे नोंदणीकृत आहे. एसबीआयच्या या योजनेत किमान 10 ग्रॅम गुंतवावे लागतील. हे सोन्याचे बार, नाणी, दागिन्यांच्या स्वरूपात असू शकते. यामध्ये तुम्ही पाहिजे तितकी गुंतवणूक करू शकता.


तीन पद्धतीने होते गुंतवणूक 


एसबीआय रिवॅम्प्ड गोल्ड डिपॉझिट स्कीम (SBI R-GDS)मध्ये तीन पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. शॉर्ट टर्म डिपॉझिट 1-3 वर्षांकरता असणार आहे. मध्यम टर्म डिपॉझिट 5-7 वर्षांकरता असेल. तर अधिक काळाकरता टर्म डिपॉझिट 12-15 काळाकरता असणार आहे. 


वेगवेगळ्या टर्मकरता व्याजदर वेगळा 


मिळालेल्या व्याजाबद्दल बोलायचे झाल्यास, अल्प मुदतीच्या ठेवींखाली, 1 वर्षासाठी 0.50 टक्के वार्षिक, 0.55 टक्के 1-2 वर्षांसाठी, 0.60 टक्के 2-3 वर्षांसाठी, 0.50 टक्के व्याज मिळते. मध्यम मुदतीच्या ठेवींसाठी दरवर्षी 2.25 टक्के आणि दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी 2.50 टक्के व्याज दर आहे. 


रोख रक्कमेत मिळणार रिटर्न 


परतफेडीच्या पर्यायाबद्दल बोलताना, तुम्ही एकतर परिपक्वतावर सोने घेऊ शकता किंवा मूल्य रोख स्वरूपात घेतले जाऊ शकते. सोन्याच्या स्वरूपात परतावा घेण्यासाठी 0.20 टक्के प्रशासकीय शुल्क कापले जाते.


किती आहे लॉक-इन पिरिएड 


लॉक-इन कालावधीबद्दल बोलायचे झाल्यास, ते अल्प मुदतीसाठी 1 वर्ष, मध्यम मुदतीसाठी 3 वर्षे आणि दीर्घकालीन 5 वर्षे आहे. लॉक-इन कालावधी पूर्ण झाल्यावर पूर्व-परिपक्व पेमेंट दंडासह मिळू शकते.