SBI home Loan Interest Rates: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने सोमवारी सकाळीच ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स आधारित कर्जाच्या दरांमध्ये (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. ही वाढ काही ठराविक टेन्योरच्या एमसीएलआरवर लागू आहे. बँकेने कर्जदरात वाढ केल्यानंतर गृहकर्ज, वाहन कर्ज आणि MCLR शी संबंधित इतर किरकोळ कर्जाचा EMI वाढणार आहे. ही वाढ 15 जुलै 2024पासून लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SBIच्या वेबसाइटवर असलेल्या माहितीनुसार, तीन महिने ते तीन वर्षांपर्यंत टेन्योर असलेल्या MCLRवर व्याजदरात 0.10 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. MCLR हा किमान व्याजदर आहे ज्यावर बँक कर्ज देऊ शकत नाही. हे बँकेच्या कर्ज घेण्याच्या ट्रेड्स दर्शवते. 2016 मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना आणण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश फंडाच्या खर्चानुसार व्याजदर ठरवणे हा आहे. जेणेकरुन कर्जाच्या व्याजदरांबबात पारदर्शकता येईल, 


EMIवर होणार थेट परिणाम 


SBIकडून MCLRमध्ये वाढ करण्यात आल्याने त्याचा परिणाम गृह आणि वाहन कर्जांसह अन्य रिटेल लोनच्या ईएमआयवर होणार आहे. MCLR शी जोडलेल्या कर्जाचा रिपेमेंट हफ्ता कर्जाच्या कालावधीनुसार वाढवण्यात येईल. उदा. जर तुमचे होम लोन 1 वर्षापर्यंत MCLRसोबत जोडलेले आहे आणि त्याची रेसेट कालावधी जवळ असेल तर लवकरच त्याच्या व्याजदरावर 10 बेसिस पॉइंटपर्यंत वाढवण्यात येईल. याचाच अर्थ तुमचा EMI वाढणार आहे. SBI 15 जुलै 2024 पर्यंत लागू करणार MCLR. जूनच्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर ठेवला होता. RBI ने सलग 8व्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करता ठेवला होता. 


30 लाख Home Loanचे गणित समजून घ्या


जर तुम्ही SBIमधून 20 वर्षांसाठी 30 लाखापर्यंतचे लोन घेत असाल. जे 1 वर्षाच्या MCLR शी लिंक आहे. व्याजदरात वाढ होण्यापूर्वी हा व्याजदर ८.७५ टक्के होता. ज्याच्या आधारावर तुमच्या गृहकर्जाची ईएमआय 26,511 रुपये होती. आता व्याजदर 8.75 टक्के झाला आहे. अशा प्रकारे तुमच्या गृहकर्जाची ईएमआय 26,703 रुपये होईल.