मुंबई : SBI Hikes MCLR : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (MCLR) 10 बेस पॉईंट्सने वाढवून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, हा बदल 15 एप्रिलपासून लागू झाला आहे.


कर्जाचा EMI वाढेल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCLR वाढल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल. SBI च्या वेबसाइटनुसार, ओव्हनाईट ते तीन महिन्यांपर्यंतच्या ग्राहकांसाठी मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) 6.65% ऐवजी 6.75% असेल.


हे आहेत नवीन दर


याशिवाय 6 महिन्यांसाठी 6.95 टक्क्यांऐवजी MCLR 7.05 टक्के असेल. त्याच वेळी, एका वर्षाच्या MCLR साठी 7.10%, दोन वर्षांसाठी 7.30% आणि तीन वर्षांसाठी 7.40%.


MCLR म्हणजे काय?


भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2016 मध्ये MCLR प्रणाली सुरू केली होती. हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा अंतर्गत बेंचमार्क आहे. MCLR प्रक्रियेत, कर्जासाठी किमान व्याजदर निश्चित केला जातो.