मुंबई : नवं घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या व्याजदरात कपात केली आहे. SBI ने होम लोन (Home Loan) वरील व्याजदरात शनिवारी कपात करत असल्याची घोषणा केली. बँकेचं होम लोन आता 6.70 टक्क्यांपासून सुरु होणार आहे. बँकेने म्हटलं की, 30 लाखांपर्यंतच्या होम लोनवर आता 6.70 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआयने म्हटलं की, 30 लाख ते 75 लाख रुपयांपर्यंत होम लोनवर 6.95 टक्के व्याजदर लागू होतील. या शिवाय 75 लाखांपेक्षा अधिकच्या लोनवर 7.5 टक्के व्याज लागू होणार आहे. 


बँकेने महिलांसाठी होम लोनवर अतिरिक्त सूट दिली आहे. महिलांसाठी 0.05 टक्के सूट आणखी देण्यात येणार आहे. 


बँकेने योनो एपच्या यूजर्ससाठी देखील विशेष सूट दिली आहे. एसबीआयने योनो एप (YONO app) ग्राहकांसाठी 0.05 टक्के आणखी सूट दिली आहे.


आरबीआयच्या माहितीनुसार, या वर्षी मार्चमध्ये बँकिंग कर्ज वितरणात 4.9 टक्के वाढ झाली आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये ही वाढ 6.8 टक्के होती. या महिन्यात फूड क्रेडिट 24.4 टक्क्याहून 18.3 टक्के आणि सर्विस सेक्टर क्रेडिट 7.4 टक्क्यांवरुन 1.4 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.


पर्सनल लोनमध्ये 15 टक्क्यांवरुन 14.2 टक्के पर्यंत घट झाली. होम लोन 15.4 टक्क्यांवरुन 9.1 टक्का झाली. कृषी आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रात कर्ज 4.2 टक्क्यांवरुन वाढून 12.3 टक्के झाले आहे. मागच्या वर्षी मार्चनंतर कर्ज वितरणाची गती खाली आली होती.