SBI मध्ये १२१ पदांची भरती, ही आहे अंतिम तारीख
मॅनेजर आणि चीफ मॅनेजर पदासाठी ही भरती असणार आहे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या SBI मध्ये नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण याठिकाणी १२१ जागांची भरती निघाली आहे.
मॅनेजर आणि चीफ मॅनेजर पदासाठी ही भरती असणार आहे.
बॅंकेने नोटीफिकेशनद्वारे अर्ज मागविले आहेत. कुठे अर्ज करायचा, शेवटची तारीख काय ? हे संपूर्ण जाणून घ्या
पोस्ट
मॅनेजर आणि चीफ मॅनेजर (वेगवेगळे विभाग)
पात्रता
फायनान्स इन पीजी डिप्लोमा/एमबीए किंवा याबरोबरीची २ वर्षाची पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टीफिकेट डिग्री असणे गरजेचे आहे. अनुभवाला प्राधान्य दिले जाईल.
वयो मर्यादा
मॅनेजर पदासाठी २५ ते ३५ वर्षे तर चीफ मॅनेजर पदासाठी २५ ते ३८ वर्ष वयाची मर्यादा राहणार आहे.
शुल्क
सामान्य आणि ओबीसी वर्गासाठी ६०० रुपयांचे शुल्क. बाकी इतर वर्गांसाठीअर्ज निशुल्क असणार आहे. निवड प्रक्रीया मुलाखतीच्याआधारे घेण्यात येईल.
शेवटची तारीख
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख ४ फेब्रुवारी आहे. १२ फेब्रुवारी पर्यंत आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार आहे.
कुठे कराल अर्ज
उमेदवारांना sbi.co.inच्या वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज करु शकता.
अर्ज करताना दिलेले नियम काळजीपूर्वक वाचा.