डेबिट कार्डावरून खरेदी करणाऱ्यांसाठी एसबीआयकडून खास सुविधा
डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यानंतर मिळणार सुविधा
नवी दिल्ली : देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा सुरु केली आहे. या सुविधेचा ग्राहक फायदा घेऊ शकतात. नवीन सुविधेअंतर्गत एसबीआय खातेधारकांना डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यानंतर आता EMI ची सुविधा मिळणार आहे.
त्यासाठी ग्राहकांना POS मशीनमधून स्वाइप करावं लागेल. म्हणजे, ज्यावेळी खरेदीनंतर कार्ड स्वाइप करता, त्यावेळी तुमचं बिल EMI मध्ये कन्वर्ट करण्याची सुविधा मिळेल.
SBI ग्राहकांना POS मशीनवर स्वाइप केल्यानंतरच ही सुविधा मिळणार आहे.
एसबीआयने केलेल्या ट्विटनुसार, POS मशीनचा वापर ४० हजारहून अधिक व्यापारी करत आहेत.
कोणताही चार्ज नाही
एसबीआयकडून ट्विट करुन सांगण्यात आले की, खरेदीचं बिल EMI मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणताही चार्ज लागणार नाही. या सुविधेसाठी बँक कोणतीही प्रोसेसिंग फी घेणार नाही आणि कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी होणार नाही.
EMI किती दिवस?
शॉपिंग बिल EMIमध्ये कन्वर्ट केल्यानंतर ग्राहकाला ६ ते १८ महिन्यात त्यांचं पेमेन्ट करावं लागेल. बँकेकडून फ्रीज आणि टीव्ही खरेदी करण्यासाठीही लोन दिले जाणार आहे.
ग्रेस पीरियड
ज्यावेळी ग्राहक खरेदी बिल EMI मध्ये कन्वर्ट करेल, त्यानंतर त्याला पुढील महिन्यापासून EMI वर रक्कम भरण्यास सुरुवात करावी लागेल. बँकेकडून SMS आणि Email द्वारे याची माहिती देण्यात येईल.
बँक अशाच ग्राहकांना लोन देणार आहे, ज्यांचा लोन ट्रॅक चांगला आहे. तुम्हाला लोन मिळेल की नाही, हे तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोरवरुन चेक करु शकता.