मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI. SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. ग्राहक आता आपल्या जुन्या डेबिट कार्डमधून रुपये काढू शकणार नाहीत. बँकने ग्राहकांना महत्वाची माहिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर ग्राहक अजूनही जुनी मॅजिस्ट्रीप (मॅग्नेटिक) कार्डचा वापर करत असतील तर तो त्यांनी तात्काळ थांबवावा. 31 डिसेंबर 2018 च्या अगोदर हे कार्ड बदलून घेणे आवश्यक आहे.


1 जानेवारी 2019 पासून या कार्डद्वारे कोणत्याही प्रकारचे ट्रान्झेशन होणार नाही आहेत. जुन्या कार्डच्या बदल्यात आलेल्या नव्या कार्डच्या EMV कार्डचा वापर करावा लागणार आहे. 


ज्यांच्याकडे जुनं मॅग्नेटिक कार्ड आहे तो दोन आठवड्यात आपलं कार्ड बदलून घ्या. ATM मशीन 1 जानेवारीपासून जुन्या कार्डचा स्विकार करणार नाही. याची माहिती बँकांनी ऑगस्ट महिन्यातच ट्वीटद्वारी दिली आहे. 


नवीन कार्डसाठी ग्राहक ऑनलाईन सेवेचा लाभ घेऊ शकतात. ज्या ग्राहकांना ऑनलाईन सेवा घेण्यास अडचणी येत असतील त्यांनी बँकेतील ब्रांचमध्ये जाऊन कार्ड बदलून घ्यायचं आहेत. 



मॅग्नेटिक कार्डला फेब्रुवारी 2017 मध्येच बंद करण्यात आलं होतं. 31 डिसेंबर 2018 पासून हे कार्ड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. पहिल्या कार्डमध्ये काळी पट्टी लावण्यात आलेली होती. याला मॅग्नेटिक स्ट्रिप असं म्हणतं. ग्राहकाची संपूर्ण माहिती यामध्ये असायची. RBI च्या म्हणण्यानुसार ही टेक्नॉलॉजी आता जुनी झाली आहे. आता ही गोष्ट सुरक्षित राहिलेली नाही.



नवीन EMV कार्ड अधिक सुरक्षित आहे. या कार्डमध्ये एक चिप लावण्यात आलेली आहे. यामध्ये देखील ग्राहकांची संपूर्ण माहिती आहे. ही संपूर्ण माहिती इनक्रिप्टेड आहे. ज्यामुळे डेटा चोरी होण्याचा धोका नाही. या कार्डची क्लोनिंग केली जाऊ शकत नाही. जुने क्लासिक आणि मेस्ट्रो कार्ड मॅग्नेटिक कार्ड आहेत. यामध्ये चीप लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे हे कार्ड बंद केले जातील.