मुंबई : तुम्ही बँकेतील नोकरीच्या शोधात असाल तर स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी चांगली संधी उपलब्ध केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बंपर रिक्त पदे आहेत. या रिक्त जागा सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) च्या रिक्त पदांसाठी आहेत. तर ही भरती एकूण 1 हजार 226 रिक्त पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारींनी लवकरच या पदांसाठी अर्ज करा. कारण यासाठी उमेदवाराकडे फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्ज करण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहिला आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.


या रिक्त पदांसाठी प्रवेशपत्र 12 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.


येथे लक्षात ठेवा की, अर्जदाराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या यादीतील कोणत्याही व्यावसायिक बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक बँकेत किमान 2 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदारांची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे आहे.


SBI भर्ती 2021: निवड कशी होईल


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवारांना 3 फेऱ्या पार कराव्या लागतील. पहिली फेरी ऑनलाइन लेखी परीक्षा, दुसरी फेरी स्क्रीनिंग आणि तिसरी फेरी मुलाखत असेल.


SBI भर्ती 2021: अर्ज कसा करावा


स्टेप 1- SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्या.
स्टेप 2- SBI CBO भर्तीशी संबंधित लिंकवर जा
स्टेप 3- तपशील भरा आणि नोंदणी करा
स्टेप 4- आयडी आणि पासवर्डसह लॉगिन करून अर्ज भरा
स्टेप 5- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा आणि अर्ज फी भरा
स्टेप 6- अर्ज डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या