SBI Recruitment : नवीन वर्ष अवघ्या काही तासांवर ठेपले आहे. यापुर्वी अनेकांनी संकल्प करायला सुरुवात केली असेलच. काहींनी चांगल्या पगाराची नोकरीवर रूजू होण्याचा संकल्प केला असेल. अशा नागरीकांसाठीच ही महत्वाची बातमी आहे. या नोकरीत वर्षाकाठी 5 लाख रूपये पगार मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवीन वर्षात जॉब बदलायचा असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे.


किती जागांची भरती?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Recruitment) तब्बल 1438 जागांसाठी मेगाभरती होणार आहे.सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी (Retired Bank Officers/Staff) या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यामुळे पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. 


शैक्षणिक पात्रता 


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त बँक अधिकारी किंवा कर्मचारी असणं गरजेचे आहे. यासोबतच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.


पगार किती? 


सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी यांना 25,000/- ते 40,000/- रुपये प्रतिमहिना पगार मिळणार आहे. तसेच उमेदवाराजवळ बायोडेटा, दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साईझ फोटो कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 


अर्जाची अंतिम तारीख?


स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Recruitment) भरतीत तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर आताच अर्ज करा. कारण या पदासाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.


या भरती संबंधीत तुम्हाला जाहिराता पाहायची असेल तर इथे क्लिक करा.


दरम्यान नवीन वर्षात नवीन जॉब शोधू पाहणाऱ्या नागरीकांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे आताच अर्ज करा.