मुंबई : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी काहीतरी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असते. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत या सुविधा पोहचवल्या जाऊन त्यांचा त्रास कमी करण्यासाठी बँकेचे प्रयत्न सुरु असतात. याच प्रयत्नात स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी 'डोअर स्टेप बँकिंग' योजनेची सुरुवात केलीय. यामध्ये ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज पडणार नाही तर बँक स्वत:च तुमच्याजवळ पोहचेल. ही सुविधा शारीरिकरित्या दुर्बल आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरु करण्यात आलीय. ग्राहक या सुविधेचा फायदा घेत घरूनच देवाण-घेवाणीचा व्यवहार पूर्ण करू शकतात. यासाठी ग्राहकांना आपल्या ब्रान्चमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल.


सुविधेचा फायदा घेण्यासाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- या सुविधेचा फायदा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि इतर स्पेशल लोक करू शकतात. बँक स्वत:हून त्यांच्यापर्यंत पोहचेल


- तुमचा KYC (know your customer) अपडेट असेल तरच तुम्हाला या सुविधेचा फायदा घेता येईल


- यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड असायला हवा


- यासाठी एक अट अशी की बँकेची ब्रान्च ५ किलोमीटरच्या आत असायला हवी


- ही सुविधा केवळ पर्सनल अकाऊंट धारकांसाठी उपलब्ध आहे


कोणत्या सुविधा मिळणार...


- पैशांची देवाण - घेवाण करणं


- चेक घेणं, चेकबुक देणं, ड्राफ्ट देणं यांसारखी काम तुम्ही पूर्ण करू शकाल


- आयकरासंबंधी काम तुम्ही या सुविधेद्वारे करू शकाल



या सुविधेसाठी वेगळी फी आकारणी?


- स्टेट बँक ऑफ इंडिया 'डोअर स्टेप बँकिंग'साठी या सुविधेसाठी किरकोळ स्वरुपात फी आकारणी करेल


- ग्राहकांना प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी १०० रुपये द्यावे लागतील


- इतर कामांसाठी ६० रुपये द्यावे लागतील


- अधिक माहितीसाठी बँकेची अधिकृत वेबसाईट  www.sbi.co.in ला भेट द्या किंवा आपल्या जवळच्या ब्रान्चला संपर्क करा