Sbi Account Holders : एसबीआय खातेधारकांसाठी वाईट बातमी
बँक खातेधारकांच्या (Bank Account Holders) डेटाबाबत अंत्यत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबई : सध्या डिजीटलचा जमाना आहे. या डिजीटल युगात डेटाला फार महत्त्व आहे. बँक खातेधारकांच्या (Bank Account Holders) डेटाबाबत अंत्यत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बँक खातेधारकांचा डेटा धोक्यात असल्याचं म्हटलं जात आहे. काही जणांना वाटेल की हे डेटा लिक होणं कसं शक्य आहे. पण हे खरं आहे. फक्त एसबीआय आणि इतर 17 बँकेतील खातेधारकांचा डेटा धोक्यात आहे. काही तज्ज्ञांनुसार, Drinik Android मेलवेयर ट्रोजनच्या रुपात विकसित करण्यात आला आहे. या Drinik Android मेलवेयरच्या मदतीने खातेधारकांची वैयक्तिक आणि बँकिंग क्रेडेंशियल माहिती चोरी करु शकतात. (sbi state bank of india account holders be carful drinik android malware is back)
धक्कादायक बाब म्हणजे ही काही पहिली वेळ नाही. याआधीही 2016 साली Drinik Android मेलवेयरचा धोका होता. तेव्हा हा मेलवेयर बँकिग क्षेत्रासाठी डोकेदुखी ठरला होता. तेव्हा या मेलवेयरच्या मदतीने एसएमएस चोरी केलं जायचं. मात्र आता हा मेलवेयर आणखी धोकादायक ठरलाय. आता या मेलवेयरच्या मदतीने स्क्रीन रेकॉर्डिंग, की लॉगिंग, एक्सेसबिलीटीचा दुरपयोग केला जात आहे.
रिपोर्टनुसार, Drinik Androidचं लेटेस्ट व्हर्जन iAssist च्या स्वरुपात आलं आहे. ही एक एपीके फाईल (Apk File) आहे. जर हे तुमच्या डिव्हाईसमध्ये इंस्टॉल झालं तर एपीके फाईल यूझर्सचं कॉल हिस्ट्री जाणून घेण्यासाठी त्याबाबत परवानगी मागतात. इतर बँकिंग ट्रोजनप्रमाणे Drinik Android एक्सेसिसिबिलीट सर्व्हिवर आधारित आहे. डिव्हाईसमध्ये सर्व आवश्यक एक्सेस मिळाल्यानंतर गूगल प्ले (Google Play) प्रोटेक्टला डिसेबल करतं. त्यानंतर ऑटो-जेस्चरला एग्जीक्यूट करतो आणि प्रेसला कॅप्चर करतं.
ही चूक करु नका
या प्रकारची फिशिंग वेबसाईटपासूनचा धोका टाळायचा असेल, तर चुकीच्या वेबसाइटवर जाऊ नका. तसेच कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका. असं करणं धोकादायक ठरु शकतं. जोपर्यंत पूर्णपणे पडताळणी करत नाही तोपर्यंत कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सोबतच विनाकारण कोणत्याही वेबसाईटवर जाऊ नका. शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही लोभात पडू नका.