एसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा
सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.
मुंबई : सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.
काय होऊ शकतो फायदा?
हा निर्णय घेण्याची चर्चा तेव्हा सुरूये जेव्हा बॅंकने एप्रिल आणि नोव्हेंबर २०१७ दरम्यान मिनिमम बॅंलेन्स नियम न पाळणा-यांकडून ग्राहकांकडून १, ७७२ कोटी रूपये दंड म्हणून वसूल केले आहेत. सध्या शहरी ब्रॅन्चमध्ये मिनिमम बॅलन्सची सीमा ३ हजार रूपये आहे. आता ही बॅंक ही अट मिनिमम बॅलन्सची अट तिमाही करण्याच्या विचारात आहे.
किती असू शकते अट?
सूत्रांनुसार, बॅंक मिनिमम बॅलन्सची सीमा साधारण १ हजार रूपये केली जाऊ शकते. पण अजून यावर निर्णय व्हायचा आहे. एसबीआयने जूनमध्ये मिनिमम बॅलन्स वाढवून ५ हजार रूपये केला होता. त्यानंतर याला विरोध झाल्याने ही मिनिमम बॅलन्सची सीमा घटवून शहरात ३ हजार, सेमी अर्बनमध्ये २ हजार आणि ग्रामीण भागात १ हजार रूपये करण्यात आली होती.
यांचा होईल अधिक फायदा
मासिकऎवजी तिमाही मिनिमम बॅलन्सच्या नियमाने त्या लोकांना फायदा होईल ज्यांच्या अकाऊंटमध्ये एखाद्या महिन्यात कॅश कमी राहते. पण नंतर ते पुन्हा पुढील महिन्यात कॅश जमा करतात.