एसबीआयने केलंय हे खास ट्वीट, ग्राहकांसाठी माहिती महत्त्वाची
जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक आहात तर तुम्हाला हे वर्ष संपण्यासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरआधी हे काम करणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी ३१ डिसेंबरआधी आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे.
नवी दिल्ली : जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक आहात तर तुम्हाला हे वर्ष संपण्यासाठी म्हणजेच ३१ डिसेंबरआधी हे काम करणे गरजेचे आहे. भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांनी ३१ डिसेंबरआधी आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे गरजेचे आहे.
जर ३१ डिसेंबरआधी तुम्ही तुमचे आधार बँक खात्याशी लिंक केले नाही तर अकाउंट वापरता येणार नाही. बँकेने हे स्पष्ट केलेय. यामुळे एसबीआयने ट्विटरही बँक खात्याशी आधार लिंक करण्याबाबतची महत्त्वाची माहिती दिलीये.
बँकेने ट्विटमध्ये म्हटलंय...
डिजीटल लाईफचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचे खाते लवकरात लवकर आधारशी लिंक करावे लागेल. यासाठी ३१ डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. जे ग्राहक ३१ डिसेंबरपर्यंत खाते आधारशी लिंक करणार नाहीत त्यांचे खाते १ जानेवारीपासून बंद केले जाईल.
सगळ्यात आधी मोबाईलच्या मेसेज बॉक्स जा. यात UID<SPACE>आधार नंबर<SPACE>खाते नंबर
उदाहरणार्थ : UID 1234569012 11002233445
आता आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरुन हा मेसेज ५६७६७६ या नंबरवर पाठवा. मेसेज सेंड झाल्यानंतर काही वेळाने बँक खात्याशी आधार लिंक करण्याबाबतची सूचना मेसेजद्वारे तुम्हाला मिळाले. या पद्धतीने तुम्ही बँख खाते आधारशी लिंक होईल.
इंटरनेट बँकिंगद्वारे तुम्ही खात्याशी आधार करा लिंक
ग्राहकांना सुरुवातीला इंटरनेट बँकिंगला लॉग ईन करावा लागेल. लॉग इन केल्यानंतर सुरुवातीला अपडेट आधार कार्ड हा ऑप्शन निवडा.