नवी दिल्‍ली : देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने(SBI) ग्राहकांना एक सूचना दिली आहे. या सूचनेत सांगण्यात आलं आहे की, तुमच्या छोट्याशा चुकीने हॅकर तुमचं अकाऊंट साफ करू शकतो. 


काय दिला इशारा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॅंकेने त्यांच्या १७ कोटी डेबिट कार्ड होल्डर्सना इशारा देत सतर्क केले की, त्यांनी त्यांच्या आईचं नाव कुणासोबतही शेअर करु नये. याचं कारण जेव्हाही युजर्स आपल्या डेबिट कार्डचा पासवर्ड रिसेट करता तेव्हा ग्राहकांना सिल्युरिटी प्रश्नांमध्ये आईचं नाव किंवा आडनाव विचारलं जातं. 


वेळेवर दिला जातो इशारा


बॅंकेकडून सांगण्यात आलं आहे की, अशावेळी जर तुम्ही आईचं नाव, सरनेम किंवा तुमचं पेट नेम कुणासोबतही शेअर केलं तर तुमच्यासाठी धोकादायक आहे. असे झाल्यास हॅकर बॅंक अकाऊंट हॅक करू शकतो. अशा गोष्टींबाबत जागरूक करण्यासाठी बॅंकेकडून वेळोवेळी मेसेज पाठवले जातात. या मेसेजमध्ये ग्राहकांनी आपले पर्सनल डिटेल्स कुणासोबतही शेअर करू नये असे सांगण्यात आले आहे. 


स्ट्रॉंग पासवर्ड असावा


सोबतच इंटरनेट बॅंकिंगचा यूजर आयडी आणि पासवर्ड गोपनीय ठेवण्यासाठी ग्राहकांना सांगितलं जातं. त्यासाठी पासवर्ड हा स्ट्रॉंग असावा. ज्यात स्पेशल कॅरेक्टर असावेत. जनरली लोक लक्षात रहावा असा पासवर्ड तयार करतात. पण यातच अकाऊंट हॅक होण्याचा  धोका जास्त असतो. कारण सायबर क्राईम करणारे हा पासवर्ड सहज हॅक करतात. त्यामुळे वेळोवेळी पासवर्ड बदलने गरजेचे आहे. 


फ्रॉड प्रकरणात गमावले १७ हजार कोटी


२०१६-१७ मध्ये बॅंकांनी फ्रॉड प्रकरणांमध्ये जवळपास १७ हजार कोटी रूपये गमावले आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत ही माहिती दिली होती. त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या फॉड मॉनिटरींग कमेटीच्या रिपोर्टच्या आधारे ही माहिती दिली होती.