SBI तुमच्या कुटुंबाला देणार फ्रीमध्ये ५ लाख रुपये, खोलावे लागेल हे खास खाते
अनेकदा जेव्हा आर्थिक तंगी जाणवते तेव्हा काहीजण पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला जितक्या पैशांची गरज तितकीच रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसते.
मुंबई : अनेकदा जेव्हा आर्थिक तंगी जाणवते तेव्हा काहीजण पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला जितक्या पैशांची गरज तितकीच रक्कम मिळेल की नाही याची शाश्वती नसते. मात्र तुम्हाला जर कोणी असे सांगितले की तुमच्या आर्थिक तंगीच्या वेळेस तुम्हाला काही पैसे फ्री मध्ये मिळतील तेही बँकेतून तर तुमचा विश्वास बसेल का? हे खरं आहे. खरंतर, भारतीय स्टेट बँकेने(एसबीआय) अशीच एक ऑफर सुरु केलीये. एसबीआय तुम्हाला फ्रीमध्ये पाच लाख रुपयांचा पर्सनल अॅक्सिडेंट इश्युरन्स कव्हर देतेय. दरम्यान, यासाठी तुम्हाला विशेष खाते खोलावे लागेल.
हे आहे विशेष खाते
एसबीआयच्या ऑफर अंतर्गत खोलले जाणारे हे खाते साधे नसणार आहे. ते विशेष खाते असणार आहे. कारण यात मिनिमम बॅलन्सची गरज नाही. तसेच हे काही काळासाठीच आहे. यासोबतच हे खाते खोलण्यासाठी विशेष तसदी घेण्याची गरज नाही. झिरो बॅलन्सवर हे खाते खोलता येईल. तसेच बँकेतही जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाईन हे खाते सुरु करु शकता.
काय आहे या खात्याचे वैशिष्टय
हे खाते झिरो बॅलन्सवर खोलता येते
यासाठी एसबीआयच्या मोबाईल अॅपवरुन yonosbi.com डाऊनलोड करावे लागेल.
या अॅपमध्ये तुम्ही खाते खोलण्यासाठी ऑनलाईन अर्ज करु शकता.
बँक खाते उघडण्यासोबतच तुमचा पर्सनल अॅक्सिडेंट इश्युरन्स होईल,
पर्सनल अॅक्सिडेंट इन्श्युरन्सअंतर्गत ५ लाख रुपयांचा विमा असेल.
खाते खोलण्यासाठी हे करा
ऑनलाईन खाते खोलण्यासाठी एसबीआयचे yono अॅप डाउनलोड करा.
खाते खोलण्यासाठी तुमच्याकडे आधार आणि पॅनकार्ड असणे गरजेचे आहे. ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला दोन्ही ओळखपत्रांची माहिती देणे गरजेचे आहे.
खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही अप्लाय करु शकता
https://www.sbiyono.sbi/wps/portal/accountopening/home#!/customeraccount
कधीपर्यंत आहे ही ऑफर
तुम्हाला हे विशेष खाते खोलायचे आहे तर तुम्हाला ३१ ऑगस्ट २०१८पर्यंत मिनिमम बॅलन्सची गरज नाही. अर्थात तुम्ही तुमच्या खात्यात झिरो बॅलन्स ठेवू शकता.दरम्यान ३१ ऑगस्टनंतर तुम्हाला मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवणे गरजेचे असेल.