नवी दिल्ली : तुमचं बँकेत अकाऊंट आहे आणि अकाऊंटमध्ये शिल्लक रक्कम कमी झाल्याने पेनल्टी भरावी लागत आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बातमीमुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने झिरो बॅलन्स अकाऊंट उघडण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जर तुम्हालाही झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करायचं आहे तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु केल्यास तुम्हाला बँक खात्यात कुठल्याही प्रकारची रक्कम शिल्लक ठेवावी लागणार नाहीये.


एसबीआयने योनो अॅप (YONO APP) च्या माध्यमातून सेव्हिंग अकाऊंट (बचत खातं) सुरु करण्याची ऑफर दिली आहे.


बॅलन्स ठेवण्याची गरज नाही


एसबीआयने योनो अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना नवं झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याची सुविधा दिली आहे. या अकाऊंटमध्ये तुम्हाला झिरो बॅलन्सवर पेनल्टी द्यावी लागणार नाहीये. या ऑफरसंदर्भात एसबीआयने आपल्या ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. 


एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक योनो अॅप (यू नीड ओनली वन) च्या माध्यमातून नवं अकाऊंट सुरु करतील त्यांना बँकेकडून झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याची सुविधा दिली जाणार आहे.


३१ ऑगस्टपर्यंत सुरु करु शकता अकाऊंट 


जर तुम्ही या सुविधेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर ३१ ऑगस्ट २०१८ पूर्वी तुम्हाला अकाऊंट सुरु करावं लागणार आहे. या तारखेनंतर अकाऊंट सुरु करणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ मिळणार नाहीये. यासोबतच हे अकाऊंट सुरु करण्यासाठी बँकेकडून काही नियम आणि अटीही ठेवण्यात आल्या आहेत. पाहूयात काय आहेत या अटी आणि नियम...



SBI च्या अटी आणि नियम...


  • या सुविधेचा लाभ केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्यांसाठीच आहे. १८ वर्षीय किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेले भारतीय नागरिक हे अकाऊंट सुरु करु शकतात. तसेच या ग्राहकांवर कुठलीही टॅक्स लायबिलिटी नसावी.


  • तुम्हीही झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्याचा प्लान करत आहात? तर तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे.


  • ग्राहकांकडे वैध आणि अॅक्टिव्ह मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे आणि हा क्रमांक त्यांच्या स्वत:च्याच नावावर असणं आवश्यक आहे.


  • तसेच तुमचा ई-मेल आयडीही असणं आवश्यक आहे. यासोबतच ग्राहकांचं ई-केवायसीही असायला हवं. झिरो बॅलन्स अकाऊंट सुरु करण्यासाठी तुम्ही जवळील एसबीआय ब्राँचमध्ये जावून ई-केवायसीसाठी बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन करावं लागणार आहे.


  • एसबीआयनुसार, एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच डिजिटल सेव्हिंग अकाऊंट सुरु केलं जावू शकतं.