मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर स्टेट बँक ऑफ इंडिया(एसबीआय) तुमच्यासाठी कमावण्याची संधी घेऊन आलीये. एसबीआयमधून तुम्ही दर महिन्याला १५ हजार रुपये कमावू शकता. इतकंच नव्हे तर तुम्हाला दर महिन्याला १ हजार रुपयांचा ट्रॅव्हल अलाऊन्सही मिळणार आहे. हे शक्य होणार आहे ते एसबीआय फाऊंडेशनच्या युथ फॉर इंडिया फेलोशिप कार्यक्रमांतर्गत. या कार्यक्रमांतर्गत २०१८-१९बॅचसाठी मार्चपासून अर्ज येण्यास सुरुवात झालीये. या रजिस्ट्रेशनची तारीख वाढवून ५ जून करण्यात आलीये.


काय करावे लागेल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसबीआय फाऊंडेशनच्या १३ महिन्यांच्या फेलोशिप कार्यक्रमांतर्गत ग्रामीण क्षेत्रातील एनजीओसोबत काम करावे लागेल. यात तुम्हाला ग्रामीण भागातील मुलांना शिकवण्यासोबतच इतरही कामे करावी लागतील. यासाठी एसबीआय फाऊंडेशनकडून तुम्हाला दर महिन्याला १५ हजार रुपयांचा स्टायपेंड दिला जाणार आहे. याशिवाय दरमहिन्याला एक हजार रुपयांचा लोकल ट्रॅव्हलिंग अलाऊन्स दिला जाणार आहे. याशिवाय कार्यक्रम यशस्वीपूर्वक पार पडल्यास ३० हजार रुपये देण्यात येतील.


काय आहे एसबीआयची युथ फेलोशिप


एसबीआयची युथ फेलोशिप दरवर्षी दिली जाते. यात तुम्हाला ग्रामीण भागात जाऊन काम करण्याची संधी दिली जाते. यासाठी एसबीआयकडून विशेष प्रशिक्षणही दिले जाते. या कार्यक्रमांतर्गत गैर-सरकारी संस्थांमध्ये काम करावे लागते. यात मुलांना शिकवण्यासोबतच अन्य कामेही करावी लागतात. याचे ट्रेनिंग आधी दिले जाते.



पात्रता


एसबीआय युथ फेलोशिपला १ मार्च २०११पासून सुरुवात करण्यात आली. यासाठी तुमच्याकडे मान्यताप्राप्त युनिर्व्हसिटीकडून डिग्री मिळवणे आवश्यक असते. याशिवाय तुमचे वय कमीत कमी २१ वर्षे आणि जास्तीत जास्त ३२ वर्षे असले पाहिजे. 


असा करा अर्ज


इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जून आहे. जर तुम्हालाही यासाठी अर्ज करायचा आहे तर सगळ्यात आधी कार्यक्रमासंबंधित माहितीसाठी www.youthforindia.org वर जाऊन माहिती मिळवा.