नवी दिल्ली : एका महिलेला मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेले स्वयंभू बाबा स्वामी ओम यांना सर्वोच्च न्यायलयाने दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशाचे नवे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता. ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता. मात्र कोर्टाने स्वामी ओम यांची याचिका तातडीने फेटाळून लावली.


लोकप्रियतेसाठी केलेल्या या याचिकेबद्दल १० लाखांचा दंड ठोठावला.
काही दिवसांपूर्वीच स्वामी ओम यांना सायकल चोरीप्रकरणाच्या एका जुन्या खटल्यात अटकही झाली होती. दरम्यान, स्वामी ओम यांनी आपल्याकडे एकही रुपया नाही, त्यामुळे मी दंड भरु शकत नाही असं सांगितले आहे. तुमच्याकडे 34 कोटी अनुयायी असल्याचा दावा करता, मग त्यांच्याकडून एक-एक रुपये जरी घेतला, तरी दंड भरु शकाल, असं कोर्टाने सुनावलं आहे.