केंद्रीय शाळांमधील प्रार्थना हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारी - सुप्रीम कोर्टाचा सवाल
सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेनुसार, हिंदी संस्कृतमध्ये होणारी प्रार्थना हिंदू धर्माला प्रोत्साहन देते.
नवी दिल्ली : देशातील १,१०० केंद्रीय शाळांमध्ये होणाऱ्या सकाळच्या प्रार्थनेवरुन वाद सुरू झाला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेनुसार, हिंदी संस्कृतमध्ये होणारी प्रार्थना हिंदू धर्माला प्रोत्साहन देते.
केंद्राला नोटीस
या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. सुप्रीम कोर्टने केंद्राला नोटीस जारी केली आहे.
केंद्रीय शाळांमध्ये होणारी सकाळची प्रार्थना हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारी असते का ? असा प्रश्न यामध्ये विचारण्यात आला आहे.
याचे उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.
शाळांना प्रश्न
सुप्रीम कोर्टाने याला गंभीर आणि संविधानिक मुद्दा म्हणत यावर गांभीर्याने विचार करण्यास सांगितले आहे.
जस्टिस रोहिंटन फली नरीमन यांच्या अध्यक्षतेखालील बेंचन केंद्र आणि केंद्रीय शाळा संघटनांना नोटीस जारी केली आहे.
केंद्रीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हाथ जोडून डोळे बंद करत प्रार्थना का म्हटली जाते ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
प्रार्थना असंविधानिक
विनायक शाह या वकिलाने ही याचिका दाखल केली. त्यांची मुलेदेखील केंद्रीय विद्यालयात शिकली आहेत. केंद्रीय शाळांमध्ये होणारी सकाळची हिंदी-संस्कृत भाषेतील प्रार्थना ही असंविधानिक असल्याचे म्हटले आहे.