आसाराम बापुला सुप्रीम कोर्टाचा दणका
आसाराम बापू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, प्रकरणाची ट्रायल खूपच हळू सुरु आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाही देता येणार. कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास साफ नकार दिला आहे आणि पुढील सुनावणी दिवाळीच्या पुढे ढकलली आहे.
नवी दिल्ली : आसाराम बापू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारलं आहे. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंच्या अडचणी वाढवल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, प्रकरणाची ट्रायल खूपच हळू सुरु आहे. त्यामुळे त्यांना जामीन नाही देता येणार. कोर्टाने आसाराम बापुंना जामीन देण्यास साफ नकार दिला आहे आणि पुढील सुनावणी दिवाळीच्या पुढे ढकलली आहे.
सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकार देखील फटकारलं आहे. कोर्टाने या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या चौकशीचा अहवाल मागितला आहे. या प्रकरणात राज्य सरकार गंभीर का नाही असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की या प्रकरणातील पीडितेची अजून चौकशी का नाही झाली. प्रकरणाचं ट्रायल इतक्या धिम्या पद्धतीने का सुरु आहे असा सवाल देखील कोर्टाने विचारला आहे. आसाराम बापू आणि मुलगा नारायण साईवर दोघांवर दुष्कर्म केल्याचा आरोपा आहे.