नवी दिल्ली : येत्या आठ तारखेला होणाऱ्या गुजरातमधल्या राज्यसभेच्या निडणुकीत नोटा वापरास स्थगिती देण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली. नोटा पर्याय राज्यसभेच्या निवडणूकीतून रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका काँग्रेसनं केली आहे. याच याचिकेत प्रथम नोटाच्या अधिकाराला स्थगिती द्यावी आणि सुनावणी तातडीनं घेऊन प्रकरण निकाली काढावं अशी मागणी होती.


पण सर्वोच्च न्यायालयानं याचिका दाखल करून घेतली असली तरी नोटा किंवा निवडणुकीला स्थगिती देणे आणि याविषयीची सुनावणी तातडीनं घेण्यासही कोर्टानं नकार दिला आहे.