Crime News : उत्तर प्रदेशातील तरुण जोडप्याने जीवन संपल्यानंतर सर्वत्र खळबळ माजलीय. हरीश बागेश आणि संचिता श्रीवास्तव हे शाळेच्या दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. करिअर आणि संसाराची स्वप्न त्यांनी एकत्र पाहिली होती. त्यानंतर हरीशने एमबीए केलं आणि मुंबईत एका खासगी बँकेत नोकरी मिळवली. तर हरीशने कसं बसं घरच्यांची मनधरणी केली आणि संचिताशी लग्न केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवविवाहित जोडपं त्यांची स्वप्न घेऊन मुंबईत आले. पण संचिताला मुंबईत काही जमलं नाही. तिची प्रकृती चांगली राहत नव्हती. अखेर त्रासलेल्या हरीशने नोकरी सोडली आणि संचिताला गोरखपूरला तिच्या डॉक्टर वडिलांकडे घेऊन आला. तिथे पत्नीचा सेवा करत नोकरीचा शोध घेत होता. 


रिपोर्टनुसार हरीशने अनेक ठिकाणी नोकरीचा शोध घेतला पण त्याला कुठेही नोकरी मिळत नव्हती. त्यानंतर दोन दिवस आपल्या घरी पाटण्याला जातो सांगून तो वाराणसीला सारनाथ भागात गेला. एमबीए होऊनसुद्धा नोकरी मिळत नाही म्हणून हताश होऊन तिथे एका होम स्टेच्या खोलीत आपलं जीवन संपवलं. 


ही बातमी मिळताच सासरे डॉ. रामचरण दास वाराणसीसाठी रवाना झाले पण इकडे घरी हरीशच्या जाण्याची बातमी लेकीच्या कानावर पडता क्षणातच तिने आपलं जीवन संपवलं. 


दरम्यान या प्रकरणाची माहिती मिळताच अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी एक्स-पोस्टमध्ये करत लिहिलंय की, भाजप सरकारच्या अपयशासाठी यापेक्षा मोठ्या प्रतिज्ञापत्राची गरज आहे का? भाजपला केवळ सत्तेच्या राजकारणाची चिंता आहे, लोकांचे कष्ट, बेरोजगारी किंवा महागाईची नाही. भाजपच्या राजवटीत हताश झालेल्या जनतेला नम्र विनंती आहे की, असे कोणतेही पाऊल उचलू नका कारण आत्महत्या हा उपाय नाही, भाजप सरकार बदलणे हाच उपाय आहे.



मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत असताना तिने मॉडलिंग सुरु केली आणि त्यावेळी तिला अंमली पदार्थांचं सेवन लागलं. त्यामुळे तिचा नवरा तिच्या वडिलांकडे घेऊन आला होता.