नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं. भारत सरकारने ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केलाय. काही राज्यांमध्ये १७ ऑगस्टला शाळा, कॉलेज आणि कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रोटोकॉलनुसार दिल्लीच्या शाळा, कॉलेज आणि कार्यालयात राजकीय दुखवट्याची घोषणा करण्यात आलीयं. यानुसार १७ ऑगस्टला हे सर्व बंद राहणार आहे. दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहीती दिली.




राजघाटावर अंत्यसंस्कार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याव्यतिरिक्त पंजाब, बिहाक, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड येथेही शाळा, कॉलेज आणि सरकारी कार्यालय बंद राहणार आहेत. १६ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट हा पर्यंत राजकीय दुखवटा असणार आहे. या दरम्यान तिरंगा अर्ध्या उंचीपर्यंत असणार आहे. अटलजींचे पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आले असून उद्या राजघाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 


विजयघाटावर स्मारक 


अटलजींच्या स्मारकासाठी दीड एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांच स्मारक उभारण्यात येणार आहे.