Viral Video: गुड टच, बॅड टच म्हणजे काय असतं? सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमधून खूप काही शिकाल!
School Teacher Viral Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे.
School Teacher Teach good touch bad touch: लहान मुलांमध्ये चांगल्या आणि वाईट स्पर्शाची जाणीव करून देणारा 'गुड टच, बॅड टच' उपक्रम व्यापकदृष्ट्या सर्वत्र राबवला जातो. शाळेमध्ये तुम्हालाही याविषयी शिकवलं गेलं असेल. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी अशा उपक्रमांना शासकीय स्तरावरून पाठबळ मिळायला हवं. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) होताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही खूप काही शिकाल. (School Teacher gave the children the lessons of good touch bad touch Video goes Viral)
लहान मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीसह समाजात जागृती होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. याची जाणीव प्रत्येक शालेय शिक्षकांना असायला हवी. अशातच सध्या व्हायरल (School Teacher Viral Video) होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका शाळकरी मुलांना आणि मुलींना गुड टच (Good touch) आणि बॅड टचचे (Bad Touch) धडे शिकवताना दिसत आहे. कोणता स्पर्श वाईट आणि कोणता स्पर्श चांगला याचं क्रिया देखील शिक्षिकेने करून दाखवली. शिक्षिकेच्या सांगण्याचा अर्थ मुलींना देखील लगेच समजला. शिक्षिकेने मुलींकडून उजळणी करून देखील घेतली. सुनैना भोला या सोशल मीडिया युझरने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
पाहा Video
गुड टच आणि बॅड टच म्हणजे काय?
एखादा व्यक्ती चांगल्या उद्देशाने किंवा हेतूने प्रेमाने स्पर्श करतो, त्याला गुड टच म्हणतात. या व्यक्तींच्या मनात काळजीची भावना असते. तर बॅड टचमध्ये व्यक्तीचा हेतू हा वाईट असतो. शरीराच्या नको त्या भागांना स्पर्श करत लुभावणारा स्पर्श नकोसा वाटतो, त्याला बॅड टच म्हटलं जातं.
दरम्यान, बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी उपयुक्त ठरलेला ‘गुड टच, बॅड टच’ हा उपक्रम महिला व बालकल्याण आणि शिक्षण विभागाने मिळून राज्यभर राबवावा, अशी सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील अनेक भागात हा उपक्रम राबवला जाणार आहे.