SCI Bharati: पदवीधर असून चांगल्या पद आणि पगाराची नोकरी शोधत असाल तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) मध्ये तुम्हाला नोकरीची संधी चालून आली आहे. या भरती अंतर्गत कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणार शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्ट भरती अंतर्गत  कायदा लिपिक-सह-संशोधन सहयोगी पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.


लॉ क्लर्क फ्रॉम रिसर्च असोशिएट पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून लॉ ग्रॅज्युएट केलेला असावा. तसेच त्याची इंडिया काऊन्सिलकडे वकील म्हणून नावनोंदणी असणे आवश्यक आहे. 20 ते 32 वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून 500 रुपये अर्जशुल्क स्वीकारण्यात येईल.


लॉ क्लर्क फ्रॉम रिसर्च असोशिएट पद हे कमी कालावधी साठी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 80 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. 


15 फेब्रुवारी 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या. 


पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी


ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात रेग्युलर बेसिसवर नोकरीचा अनुभव असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराकडे मॅट्रीक्समध्ये लेवल 3  (21700-69100)  मध्ये किमान 5 वर्षे नियमित सेवा पूर्ण केल्याचा अनुभव असावा. सिनीअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतील पदवी असावी. तसेच रिसेप्शन ड्युटी संबंधित कामाचा एक वर्षाचा अनुभव असावा. गृह मंत्रालय भरती 2024 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार बातमीत देण्यात आलेला अर्ज तपशील वाचून अर्ज करु शकता. रोजगार समाचारमध्ये जाहीरात आल्याच्या 60 दिवसांच्या आत म्हणजेच 1 मार्च पर्यंत तुम्ही अर्ज करु शकता.