Scooty Damaged Viral Video: पावसाळ्यात भारतातील रस्त्यांची अवस्था काय असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या काळात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य असतं. यामुळे अनेक दुर्घटना देखील घडतात. त्यामुळे या काळात रस्त्यावरून वाहनं चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते. या काळात अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.  मात्र काही व्हिडीओ तुम्हाला हसायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक स्कूटी रस्त्यावर पाणी साचलेलं असताना मध्येच बंद पडते. पण पावसाचं घाण पाहून तरुणी खाली उतरणे टाळते. मग पुढे काय होतं हे पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कूटी सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच तरुणाचा तोल बिघडतो आणि स्कूटी खाली पडते. स्कूटीसोबतच त्यावर बसलेली मैत्रीणही पाण्यात पडते. पावसाच्या साचलेल्या घाण पाण्यात भिजते. मुलीला धडा शिकवता यावा म्हणून त्या मुलाने हे जाणूनबुजून केले असावे, असे काही नेटकरी गंमतीने म्हणत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओला लाखो लोकांनी लाइक देखील केले आहे. कमेंट सेक्शनमध्येही लोक वेगवेगळ्या आणि मजेदार प्रतिक्रिया देत आहेत.