...आणि मोठ्या भावाने त्याचे हातच तोडले
बाईकवर स्क्रॅच आल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचे हात तोडल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडलीये.
मेरठ : बाईकवर स्क्रॅच आल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचे हात तोडल्याची धक्कादायक घटना मेरठमध्ये घडलीये.
याप्रकरणी पिडीत व्यक्तीच्या पत्नीने आरोपीविरोधात एफआयआर दाखल केलीये. बाबरी ठाणे परिसरातील बुटाराडा गावचे निवासी असलेल्या गुलजामा यांच्या भाच्याने त्यांच्या नव्या कोऱ्या बाईकवर स्क्रॅच केला. यामुळे गुलजामा यांनी आपल्या भाच्याला कडक शब्दात समज दिली.
यावेळी गुलजामा याच्या भावाने आपल्या मुलाला ओरडल्याबद्दलचा जाब विचारला. यातच गुलजामा आणि त्याचा मोठा भाऊ कालू यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावेळी रागात असलेल्या कालूने गुलजामावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात गुलजामाचा एक हात तुटला. तर दुसऱ्या हाताचा अंगठा तुटला.
घटनेनंतर गुलजामाचा मोठा भाऊ कालू घटनास्थळावरुन पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.