SDM Jyoti Maurya Case: उत्तर प्रदेशमधलं ज्योती मौर्य आणि आलोक मौर्य प्रकरण (SDM Jyoti Maurya) संपूर्ण देशभर गाजलं. आलोक मौर्यने (Alok Maurya) आपल्या पत्नीला कर्ज काढून शिकवलं, पण मोठ्या पदावर सरकारी नोकरी लागल्यावर ज्योती मौर्यने पतीला सोडलं. अधिकारी झाल्यानंतर 2020मध्ये ज्योतीच मनीष दुबे नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. मनीष होमगार्ड कमांडंट आहे. अलोकने ज्योती आणि मनीष दोघांनाही रंगेहाथ पकडले होतं. पण ज्योतीने आलोकवरच उलट आरोप केले. सासरचे लोक हुंड्यासाठी (Dowry) छळ करत असल्याचा आरोप केला. तसा गुन्हाही दाखल केला. सोशल मीडियावर (Social Media) हे प्रकरण चांगलंच गाजलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योती-आलोक एकत्र येणार?
गेले अनेक महिने ज्योती आणि आलोक प्रकरणात गाजत असून कोर्टातही यावर सुनावणी सुरु आहे. पण आता ज्योती मोर्या आणि आलोक कुमार मौर्या यांच्यात समेट होण्याची शक्यता आहे. ज्योती मौर्याने सांमजस्याची भूमिका घेतली आहे, तर आलोक कुमार मौर्याही शांत आहे. ज्योती मौर्याने दाखल केलेल्या याचिकेवर 22 सप्टेंबरला कोर्टात सुनावणी होणार होती. पण ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. आता 26 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. तर आलोकने ज्योतीवर भ्रष्टाचाराचे लावलेले आरोपही मागे घेतले आहेत. 


ज्योती मोर्या आणि आलोक मौर्या यांच्यातल्या वादाची सुनावणी उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजच्या कौटुंबिक कोर्टात सुरु आहे. या दोघांचं भांडण देशभर व्हायरल झाल्यानंतर आता दोघं एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्योती मौर्या यांच्याविरोधातील आरोप मागे घेत असल्याचं आलोकने स्वत: म्हटलं आहे. दोघांमध्ये समेज झाल्याचं अद्याप आलोकने म्हटलं नसलं तरी सकारात्मक भूमिका असल्याचं म्हटलं आहे. 


काय आहे ज्योती मौर्य प्रकरण
2010साली ज्योती नावाच्या मुलीचं लग्न आलोक यांच्यासोबत झालं. लग्नानंतर पुढील शिक्षण सुरू ठेवण्याची तिची इच्छा होती. सफाई कर्मचारी असलेल्या आलोकने ज्योतीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कमाईतून ज्योतीला शिकवलं. एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्येही तिचं अॅडमिशन केलं.  शिक्षण पूर्ण करुन तिला मोठ्या पदावरची सरकारी नोकरी लागली. पण अधिकारी होताच ज्योतीने सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ करत असल्याचा आरोप केला आणि आलोकपासून वेगळी झाली. 


ज्योतीचे विवाहबाह्य संबंध असून तिच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याचा आरोप अलोकने केला होता. तसंच ज्योतीबरोबरचे व्हॉट्सअॅप चॅटही आलोक मोर्याने व्हायरल केले होते. यावर बोलताना ज्योतीने आमच्या नात्यात गेल्याकाही दिवसांपासून तणाव आहे. माझ्या पतीसोबतच्या नात्यात खूप अडचणी आहेत. मी याआधीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मी कायदेशीररित्या घटस्फोटासाठी लढत आहे. याव्यतिरिक्त माझे कुठेच काही नाहीये, असं स्पष्टीकरण ज्योती मौर्य यांनी दिलं होतं.