नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (cyrus mistry) यांच्या निधनानंतर कारमधील सीट बेल्टचा  (seat belt) मुद्दा तापला आहे. सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात (car accident) मृत्यू झाला. त्याने सीट बेल्ट घातला नसल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. त्यामुळे अनेक सेलिब्रिटींकडून सीट बेल्टबाबत जागरुकता केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारनेही यासंदर्भात कठोर पावलं उचलत सीट बेल्टशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याचे म्हटलं आहे. यासोबतच लोकांना कारमधून प्रवास करताना सीट बेल्ट घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  दरम्यान, सीट बेल्ट संदर्भात जागृती करणारे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाक एक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि तो पाहून सीटबेल्ट का महत्त्वाचा आहे हे लक्षात येईल.


हा व्हिडिओ जवळपास 3 वर्षे जुना आहे, मात्र तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक धोकादायक कार अपघात दाखवण्यात आला आहे. मात्र सीट बेल्टमुळेच कार चालक वाचतो. वाहनात बसवण्यात आलेल्या डॅशकॅमवरून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे. कार महामार्गावरून जात असताना अचानक समोरून एक मोठा ट्रक आल्याचे दाखवण्यात आले आहे. ट्रक आल्याने गाडीची जोरदार धडक बसली, तरी चालकाला कोणतीही दुखापत झालेली नाही ती फक्त सीट बेल्टमुळे.



सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर समोरच्या सीटवर बसलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाशाने सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे इतकेच नाही तर मागील प्रवाशांनीही सीट बेल्ट लावणे आवश्यक आहे हे अधोरेखित झालं आहे


दरम्यान, कायद्यानुसार, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न लावल्यास 1000 रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे. या तरतुदीचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास वाहतूक पोलिस क्वचितच लोकांना दंडही करतात