Saa₹thi App | शेअर बाजार गुंतवणुकदारांसाठी खुशखबर! SEBI कडून मोबाईल ऍप लॉंच
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणखी सोपं होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या नवीन गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता शेअर बाजारात गुंतवणूक करणे आणखी सोपं होणार आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बोर्डाचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी बुधवारी गुंतवणूकदारांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सारथी ((Saa₹thi)) हे मोबाईल अॅप लॉन्च केले. यामध्ये गुंतवणूकदारांना अनेक प्रकारची माहिती मिळेल.
SEBI चे नवीन app
सेबीने दिलेल्या माहितीनुसार, या app वरून गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केट, केवायसी प्रक्रिया, ट्रेडिंग आणि सेटलमेंट, म्युच्युअल फंड, मार्केट याविषयी अपडेट मिळत राहतील. यामुळे त्यांना बाजारातील चढ-उतारांची माहिती राहील. यासोबतच गुंतवणूकदारांच्या तक्रारी निवारण यंत्रणेसारख्या गोष्टींची माहितीही उपलब्ध होणार आहे.
तरुणांसाठी हे app ठरेल खास
या अॅपचा शुभारंभ करताना त्यागी म्हणाले, “हे मोबाइल app गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज मार्केटविषयी ज्ञान देऊन गुंतवणूकीसाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने SEBI चा एक उपक्रम आहे. अलीकडेच अनेक नवीन गुंतवणूकदारांनी बाजारात प्रवेश केल्यामुळे, बहुतांश व्यवहार हे मोबाईल फोनवरून केले जात आहेत.
हे app महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती जनतेपर्यंत सहज उपलब्ध करून देण्यात मदत करेल. मला खात्री आहे की येत्या काळात हे app गुंतवणूकदारांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होईल.
हे app दोन भाषांमध्ये उपलब्ध
हे app हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ते तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनवर वापरू शकता. म्हणजेच, तुम्ही ते प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअर दोन्हीवरून डाउनलोड करू शकता.