नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, सरकारने नुकताच अध्यादेश काढून बँकांचे वाढते एनपीए नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला काही विशेष अधिकार दिले आहेत. त्यानंतर जाहीर होणाऱ्या आजच्या आढव्यात बँकांची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी रिझर्व्ह बँक काही विशेष आराखडा देते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


बँकिंग क्षेत्रातल्या एनपीएचं प्रमाण सात लाख कोटींच्या वर गेलंय. त्यामुळे देशातल्या बँका टिकवायच्या असतील तर तातडीनं याविषयी निर्णय घेणं अत्यावश्यक बनलं आहे. आता रिझर्व्ह बँकेला याविषयीचे अधिकार मिळाल्यावर काय कारवाई होते याकडे बाजाराचं लक्ष आहे. याशिवाय पुढच्या काही महिन्यात महागाईचं लक्ष्य चार टक्क्यांवर निर्धारित करण्याची घोषणाही आजच्या आढाव्यात होण्याची शक्यता आहे.