अहमदाबाद : गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळच्या सत्रात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दुपारी दोन वाजेर्पंयत ४९ टक्के मतदान झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पीएम नरेंद्र मोदी, आनंदीबेन पटेल, अमित शाह, अरुण जेटली, भरत सिंह सोलंकी, हार्दिक पटेल, नितिन पटेल, शक्ति सिंह गोहिल, शंकर सिंग वाघेला आणि माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवाणी यांनी मतदानाचा हक्क बजावला


दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी २५ टक्के मतदान झाले. निकालाचं सर्वात मोठं कव्हरेज झी२४ तासवर दाखविण्यात येणार आहे. आज संध्याकाळी एक्झिट पोल दाखविण्यात येणार आहे.
 
गजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पहिल्या चार तासात सरासरी २५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला.  सकाळी आठ वाजता हवेत गारठा असला तरी ग्रामीण आणि शहरी भागात मोठ्याप्रमाणात रांगा लागलेल्या आहेत.