केरळमध्ये आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण
चीनमधल्या कोरोनाच्या बळींचा आकडा तीनशेच्या वर गेला आहे.
मुंबई : केरळमध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळला आहे. चाचण्यांअंती त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी चीनला जाऊन आली होती. त्यानंतर आता या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर तिकडे चीनमधल्या कोरोनाच्या बळींचा आकडा तीनशेच्या वर गेला आहे.
चीनमधील भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी गेलेलं एअर इंडियाचं दुसरं विमानही आज मायदेशी परतलं आहे. या विमानातून ३२३ भारतीय नागरिकांना परत आणण्यात आलं आहे. या विमानात ७ मालदिवच्या रहिवाशांचाही समावेश आहे. दरम्यान चीनमधल्य़ा वुहानमध्य़े कोरोनाचा धुमाकुळ सुरुच आहे. आतापर्यंत कोरोनानं ३०० हून अधिक नागरिकांचा बळी घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी शनिवारी संध्याकाळी बैठक घेतली. चीनमधून भारतात येणाऱ्या लोकांची माहिती ते घेत आहेत. त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था देखील सरकारकडून केली जात आहे.
देशभराती विविध शहरांमध्ये आलेल्या ३२६ विमानांमधून भारतात आलेल्या ५२,३३२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. चीनमध्ये हा व्हायरस सध्या जीवघेणा ठरला आहे. इतर देशांवर देखील याचं सावट आहे.