नवी दिल्ली :  काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ च्या निवासस्थानाला निशाणा केलं. पण जवानांच्या जागृकतेने हल्ल्याचा कट उधळवून लावला.


घुसघोरीचा प्रयत्न 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी सकाळी साडे चार दरम्यान २ दहशतवादी ए के ४७ असलेली बॅग घेऊन नगरमधील सीअरपीएफ कॅम्पमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.


तिथे ड्युटीला असणाऱ्या सैनिकांनी त्याला पाहिले.त्यांच्यावर फायरिंग केली. 


गोळीबार सुरूच 


 त्यानंतर जवानांवरही गोळीबार करत दहशतवाद्यांनी तिथून काढता पाय घेतला. कॅम्पच्या बाहेर असलेल्या बिल्डिंगमध्ये लपल्याचे सांगितले जात आहे.


सुरक्षा रक्षकांनी त्या बिल्डिंगला घेरलेय. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू आहे. 


एक जवान शहीद 


 या गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे सांगितले जातेयं.  सुंजवान येथे झालेल्या हल्ल्यानंतर दोन दिवसातच हा हल्ला झालायं.