मुंबई :  कोरोना व्हायरसचा  (Coronavirus) प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे.  कोविड -19च्या दुसर्‍या लाटेत (Second wave of Coronavirus) नवीन लक्षणे दिसून येत आहेत. याचा धोकाही जास्त दिसून येत आहे. कोरोना विषाणूची ही दुसरी लाट (कहर) भारतामध्ये दिसून येत आहे. गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 2 लाख 73 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची नोदं झाली आहे. तर 1600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन सिलिंडरची मागणी इतकी वाढली आहे. केंद्र आणि राज्य सरकार ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थ आहेत.


कोरोना विषाणूची अनेक नवीन लक्षणे समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांसाठी आणखी एक समस्या पुढे आली आहे. बर्‍याच रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे असूनही त्यांचा आरटी-पीसीआर चाचणी अहवाल नकारात्मक येत आहे म्हणजेच आता तपासणी देखील कोरोना संसर्गाला पूर्णपणे पकडत नाही आहे. अशा लोकांमुळे संक्रमणाचा प्रसार होतो आणि काहीवेळा परिस्थिती गंभीर झाली तरीही ते मरत आहेत. Double mutant virusची काही विलक्षण लक्षणे आहेत, जी कोविड -19 चाचणीत दिसून येत नाही. 


घसा खवखवणे -


जर तुमच्या घशात खाज येत असेल आणि त्रास होतो. तसेच घसा खवखवत असेल किंवा घश्यात सूज येत असेल असे वाटत असेल तर ते  कोविड -19 चे लक्षणदेखील असू शकते. जगभरात सुमारे 52 टक्के कोरोना प्रकरणात घशाची लक्षणे दिसली आहेत.


थकवा - 


यूके तज्ज्ञांच्या मते थकवा जाणवण्याची जर समस्या येत असेल तर कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे हे एक लक्षण आहे. अनेक रुग्णांना व्हायरसची पॉझिटिव्ह टेस्ट घेण्यापूर्वी अशक्तपणा आणि अत्यधिक थकवा येण्याची समस्या दिसली आहे.


शरीर दुखणे- 


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार असे बरेच रुग्ण आहेत ज्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना शरीरात दुखणे, सांधेदुखी आणि स्नायू दुखण्याची समस्या दिसली आहे. याचे कारण म्हणजे कोरोना विषाणू स्नायूंमध्ये असलेल्या  (Body pain) मांसपेशिंवर देखील विषाणू हल्ला करतो, ज्यामुळे शरीरावर वेदना होण्याची समस्या उद्भवते.
 
चक्कर येणे - 


बर्‍याच लोकांनी याबद्दल माहिती दिली आहे की कोविड -19 संसर्गामुळे त्यांना गरगरल्यासारखे वाटते, चक्कर येणे, थकवा आणि मळमळ यासारख्या समस्या येत आहेत.


लाळेचा अभाव-


आपल्या तोंडात असणारी लाळ  तोंडाला आणि शरीरास खराब जीवाणूपासून संरक्षण देते, परंतु जर तुमचे तोंड कोरडे होण्यास सुरुवात होते.  (Dry mouth)आणि लाळ (No Saliva in mouth) तयार होणे थांबले गेले तर हे देखील कोरोना संसर्ग आहे. इशारा असू शकतो. या लक्षणांमुळे लोकांना खाणे चघळण्याची किंवा बोलण्यातही अडचण येऊ शकते.


या व्यतिरिक्त, त्वचेवर पुरळ उठणे, जिभेवर पुरळ उठणे, जिभेच्या पुरळ उठणे, तोंडात दुखणे किंवा डोकेदुखी देखील कोविड -19ची लक्षणे दिसतात. जर आपण स्वत: मध्येही यापैकी कोणतीही लक्षणे असतील तर घाबरु नका, आपली चाचणी करा आणि घरीच विश्रांती घ्या.


(टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. झी 24 तास या माहितीची जबाबदारी घेत नाही.)