EPFO Pension: भविष्यात आपल्याला अनेक आधारांची गरज लागते आणि त्यातला महत्त्वपुर्ण आधार म्हणजे आर्थिक. आर्थिक आधाराशिवाय आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे आपण नेहमीच असा विचार करतो की आपल्या कुटुंबियांसाठी आपण त्यांचे भविष्य जास्त सुरक्षित कसे करू शकू. त्यातून आपल्या मुलांसाठीही आपण तसाच विचार करतो. केवळ विचारच नाही तर त्यापद्धतीनं आपण सेव्हिंग्स आणि एनव्हेसमेंट (Investments for your family) करायचाही कसोशीनं प्रयत्न करतो. त्यामुळे पैसे गुंतवण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय हवे असतात. त्यातूनही आपल्याला या सगळ्या पर्यांयामध्ये अधिक सुरक्षितताही हवी असते. त्यातला सर्वात सोप्पा पर्याय म्हणजे भविष्य निर्वाह निधी (EPFO). खातेधारकांना या खात्यावर चांगले फायदे मिळत असतात आणि यातलाच मोठा फायदा आहे तो म्हणजे पेन्शनचा. तेव्हा जाणून घेऊया कर्मचाऱ्यांसह तुमच्या कुटुंबियांनाही याचा कसा फायदा होऊ शकतो. (secure your future with your epfo pension scheme not only for you but your family also)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईपीएफ (EPF) पेन्शन स्किमचा फायदा आपल्या सगळ्यांना जरूरीचा असतो. परंतु या योजनेचे अनेक नियमही असतात जे अनेकदा ग्राहकांना माहिती नसतात. एकदा कर्मचारी म्हणून तुम्ही या योजनेचे सदस्यत्व घेता तेव्हा तुम्ही तुमचं आणि तुमच्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करू शकता आणि त्यातून निवृत्तीनंतरही तुम्हाला  EPS-95 अंतर्गत निवृत्ती वेतन दिले जाते. हे वेतन फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबियांनाही मिळू शकते. तेव्हा जाणून घेऊया तुम्ही या योजनेचा फायदा (Benefits of EPFO) कसा करू घेऊन शकतो. यासाठी तुम्हाला काही नियमही समजून घ्यावे लागते. जर तुमचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबियाना पेन्शन मिळू शकते. यामध्ये काही असे नियम आहेत ज्यांचे पालन तुम्हाला करावे लागणार आहे. ज्या पालकांनी त्यांचं अपत्य गमावले आहे त्यांना ईपीएफओ पुर्णपणे मदत करते पण त्यात काही अटी आणि नियम (How to login on EPFO) आहेत.


कस कराल हिशोब? 


  • जेव्हा तुम्ही कर्मचारी म्हणून कंपनीमध्ये प्रवेश करता तेव्हा 12 टक्के तुमच्या पगारातील रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होते. 

  • जेव्हा तुम्ही रिटायर्ड होता तेव्हा तुम्हाला कंपनीचे कर्मचारी म्हणून ही सगळी रक्कम व्याजासकट परत मिळते. 

  • 12 टक्क्यांपैंकी 3.67% EPF मध्ये आणि उर्वरित 8.33% EPS जातो. EPS म्हणजे तुमची कर्मचारी पेन्शन योजना. 

  • ज्यात तुमच्या पेन्शनचे पैसे जमा केले जातात. EDLI कॅल्क्युलेटरचा वापर करत तुम्ही तुमच्या पेन्शनचा हिशोब करू शकता. 

  • तुम्ही पेन्शन कॅल्क्युलेटरवर गेलात की एक प्रक्रिया असते जी तुम्हाला पुर्ण करायची असते. यावर गेलात की पेन्शन सुरू होण्याची तारिख त्यात टाका. 

  • मग पगाराची रक्कम टाका. 

  • त्यानंतर तुमचे तपशीलही टाका. मग अपडेट करा त्यानंतर तुम्हाला तुमची पेन्शनची रक्कम दिसेल.  



काय आहेत अटी आणि नियम? 


  • पेन्शन (Pension) मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी किमान यातून 10 वर्षे सेवा पुर्ण केलेली असावी. 

  • नोकरीदरम्यान कोणत्याही आजारामुळे, अपघातामुळे अपंगत्व आलं तर कर्मचाऱ्याला आयुष्यभर पेन्शन मिळेल. यासाठी त्यानं 10 वर्षांचा नोकरीचा कार्यकाळ पुर्ण करण्याची आवश्यकता नाही.