श्रीनगर :  जम्मू-काश्मीरात सुरक्षा दलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. 'बेडरुम जिहादी' हा नवा शत्रू निर्माण झालाय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांची डोकी भडकवली जात आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफवा आणि युवकांची डोकी भडकविण्यासाठी दहशतवादी घरात घुसून काम करत आहेत. यासाठी सोशल मीडियाचा साहरा घेतला जात आहे.


 जम्मू काश्मीरमध्ये 'बेडरुम जिहादी' घरात बसून सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणे आणि तरुणांना चिथावणी देण्याचे काम करत असून त्यांच्यावर चाप लावण्याचे आव्हान सुरक्षा दलांसमोर आहे.
जम्मू काश्मीरमध्ये हातात शस्त्र घेणारे तरुण हे सुरक्षा दलांसाठी चिंतेचा विषय होता. पण आता काळानुरुप बदल होत आहे. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न पुढे आलाय.


सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दहशतवादी संघटनेत भरती करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या मंडळींना 'बेडरुम जिहादी' असे म्हटले जाते. ही मंडळी त्यांच्या घरात, बेडरुम, सायबर कॅफे किंवा अगदी रस्त्यावर बसूनही काम करतात असे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. 


याचा फटका अमरनाथ यात्रेला बसू शकतो अशी शक्यता अधिकारी सांगतात. २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार  आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे.