मुंबई : नवीन वर्ष येण्यास अवघे काही तासच बाकी आहे. प्रत्येकजण नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत. मात्र त्या पेक्षाही जास्त काही लोकांना या वर्षी किती सुट्ट्या मिळतील हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. जेणेकरून त्यानुसार नियोजन करणं शक्य होईल. मात्र आता अशा लोकांची उत्सुकता संपलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने 2022 वर्षाच्या अनिवार्य सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला या नवीन वर्षात किती सुट्ट्या मिळणार आहेत हे समजू शकेल.


2022 मध्ये 14 सुट्ट्या अनिवार्य


2022 मध्ये एकूण 14 अनिवार्य सुट्या असणार आहे. याचसोबत तुम्ही पर्यायी सुट्ट्यांच्या यादीतून काही सुट्ट्या घेऊ शकता. दिल्लीबाहेरील सरकारी कार्यालयांमध्ये 14 सक्तीच्या सुट्या असतील आणि तुम्ही 12 पर्यायी सुट्ट्यांपैकी 3 सुट्ट्या घेऊ शकता.


2022 मधील सुट्ट्या


  • प्रजासत्ताक दिवस- 26 जानेवारी 2022

  • महावीर जयंती -14 एप्रिल 2022

  • गुड फ्राइडे- 15 एप्रिल 2022

  • ईद-उल-फितर- 03 मे 2022

  • बौद्ध पोर्णिमा- 16 मे 2022

  • बकरी ईद - 10 जुलै 2022

  • मोहरम- 09 ऑगस्ट 2022

  • स्वतंत्र दिवस- 15 ऑगस्ट

  • गांधी जयंती- 02 ऑक्टोबर 2022

  • दसरा - 05 ऑक्टोबर 2022

  • पैगंबर मोहम्मद वाढदिवस- 7 ऑक्टोबर 2022

  • दिवाळी- 24 ऑक्टोबर 2022

  • गुरुनानक जयंती- 08 नोव्हेंबर 2022

  • क्रिसमस- 25 डिसेंबर 2022


अनेक राज्यांमध्ये महाशिवरात्री आणि होळीची सुट्टीही असणार आहे. यावेळी महाशिवरात्री 1 मार्च आणि होळी 18 मार्च रोजी आहे.