मुंबई : लोकांमध्ये सेल्फी काढण्याची क्रेझ नेहमीच असते. सेल्फी काढण्याच्या नादात जगभरात अनेकदा अपघात घडले आहेत अशीच एक घटना एका प्राणीसंग्रहालयात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राणीसंग्रहालयात गेलेल्या एका महिलेला थेते एक उंट दिसतो. खरे तर उंट पिंजऱ्यात असतो. म्हणून महिला त्या उंटाच्या जवळ जाऊन आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो काढते. त्यानंतर ती सेल्फी घेते. परंतू असे करीत असताना उंट पिंजऱ्याबाहेर तोंड काढून महिलेचे केस तोंडात पकडून जोरात ओढतो. त्यामुळे महिलेला प्रचंड वेदना होतात. या सगळ्या अपघातात महिलाल जोर जोरात किंचाळते.



IFS अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ


हा व्हायरल व्हिडिओ IFS अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून लोक प्राणीसंग्रहालयात गेल्यावर प्राण्यांपासून दूर राहण्याचा सल्ला ते देत आहेत. व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे.  व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असल्याने त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत.