Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज अमेरिकी डॉलर इतका होता. अगदीच वेगळ्या दृष्टीकोनातून सांगायचे झाले तर, भारतात फक्त 35 अशा कंपन्या आहेत ज्यांचे बाजार भांडवल किमान 25 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकं आहे.


2.05 लाख कोटी रुपये बुडाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 च्या पहिल्या महिन्यात HDFC बँकेचे शेअर्समध्ये 16 टक्क्यांपर्यंत उलथापालथ झाली. या बँकेच्या शेअर्समुळे निफ्टी 50 आणि निफ्टी बँक निर्देशांक समसमानप्रमाणात घसरले. दोन्ही निर्देशांकांवर सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या HDFC बँकेने या वर्षी निफ्टी बँकेच्या निर्देशांकातील घसरणीत तब्बल 67% योगदान दिले आहे. निफ्टी बँकेवर 38% भार पडला तर निफ्टी 50 वर चांगला 12% पर्यंतचा भार पडला. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एचडीएफसीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांचे मागील 6 महिन्यामध्ये 2.05 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.


बँक व्यवस्थापक मात्र आशावादी


मात्र, बँकेचे व्यवस्थापक हे तफावत आणि दीर्घकालीन वाढीचे संरक्षणाबद्दल खूप आशावादी वाटत असल्याचं दिसून येत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अजूनही बँकेकडे 19% वाढीव ठेवींचा वाटा आहे. CNBC-TV18 च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक स्टॉकमध्ये नुकतीच झालेली पडझड ही सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (SEBI) नव्या नियमानुसार लाभार्थी मालकांच्या नफ्यासंदर्भातील माहिती जाहीर करण्याच्या नियमामुळे आहे. सूत्रांनी पुढे सांगितले की बँकेने या प्रकरणासंदर्भातील गोंधळ संपवण्यासाठी बाजार नियामकाशी संपर्क साधला आहे. ओळखता न येणारे प्रवर्तक नसलेल्या कंपन्यांना हा नियम लागू होत नाही, याकडे कंपनी लक्ष वेधत आहे.


बँकेची मालकी कोणाकडे?


नव्या शेअरहोल्डिंग डेटानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांकडे (FPIs) 52.3% होल्डिंगसह निम्म्याहून अधिक बँकेची मालकी आहे. देशांतर्गत म्युच्युअल फंडांमध्ये बँकेचा 19.5% हिस्सा आहे, तर 9% पेक्षा थोडा जास्त हिस्सा कंपनीच्या मालकीच्या विमा कंपन्यांचा आहे.


बँकेची पत घसरली


एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची विक्री सुरू राहिल्याने इतर खाजगी लेंडर्सबरोबर त्याचे मूल्यांकन प्रीमियम कमी झाले. काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात महाग बँक स्टॉक असलेला कर्जदाता आता कोटक महिंद्रा बँक आणि ICICI बँक या दोन्हींपेक्षा फार स्वस्तात उपलब्ध आहे.


कोटक महिंद्रा बँक त्याच्या एक वर्षाच्या फॉरवर्ड बुक व्हॅल्यूच्या 3.3 पटीने व्यापार करते, असं ब्लूमबर्गचा डेटा सांगतो. तर याच डेटानुसार ICICI बँक 2.7 x ने बुक व्हॅल्यूच्या माध्यमातून व्यापर करते. खरं तर, एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक यांच्यातील मूल्यमापन अंतर सहा महिन्यांपूर्वीच्या 30% वरून 15% पर्यंत कमी झाले आहे.