`सेना जल` प्याल तर शहीद जवानांच्या पत्नींना होईल मदत
`सेना जल` केवळ ६ रुपयांत उपलब्ध होणार आहे. `AWWA` याची निर्मिती करत आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला तहान लागलीए आणि पाण्याची बॉटल शोधताय तर तुमच्याकडे अजून एक पर्याय उपलब्ध होत आहे.
तहान भागवायला तुम्ही 'सेना जल' प्राधान्य देऊ शकता. कारण याची सर्व रक्कम ही 'आर्मी वाइफ्स वेल्फेअर असोसिएशन'(AWWA) ला जाते.
किंमत
या बॉटलची किंमतही तुमच्या खिशाला परवडणारी असणार आहे. 'सेना जल' केवळ ६ रुपयांत उपलब्ध होणार आहे. 'AWWA' याची निर्मिती करत आहे.
विक्रीला सुरूवात
११ ऑक्टोबर २०१७ पासून या बॉटल्सची विक्री होणार आहे. वेळेनुसार यामध्ये बदल करण्यात येणार आहेत.
अशी होणार मदत
यातून होणारी कमाई शहीद जवानांच्या विधवा पत्नी लोक कल्याण फंड वापरण्यात येणार आहे.
याचसोबत जवानांनाही यातून आर्थिक मदत होणार आहे. जवानांच्या परिवारांनाही यातून मदत पोहोचविली जाणार आहे.
इथे करा संपर्क
'सेना जल' ची डिलरशीप घेण्यासाठी दिल्लीतील डिफेंसचे हेडक्वार्टर AWWA सचिवालय कार्यालयाशी शी संपर्क करावा लागणार आहे.
काय आहे AWWA ?
AWWA हा भारतीय सेनेचा अदृश्य हाथ आहे. आर्मी चीफ बिपिन रावत यांची पत्नी मधुलिका रावत या ही संस्था चालवितात.
शहीद जवानांचे परिवार आणि पत्नींचे सामाजिक सशक्तिकरण आणि कौशल्य विकास करणे हे याचे उद्दीष्ट आहे.